विरोधकांनी डोळ्यावरची पट्टी काढून विकास पहावा : आ. शंभूराज देसाई

काळगाव – विरोधकांनी डोळ्यावर लावलेली पट्टी काढून रस्त्यावर उतरावे आणि विकास पहावा. डोंगरी भागातील सर्वसामान्य जनता व लोकांसाठी विकासकामाची गंगा पोहचवली असून आम्ही कागदावर विकास करत नाही. विकासकामे ही तालुक्‍यातील जनतेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचवण्याचे काम करणार असल्याचे मत आ. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

मुट्टलवाडी (काळगाव), ता. पाटण येथे आमदार निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या भुमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रविराज देसाई, डी. आर. पाटील, अशोकराव पाटील, मिलिंद पाटील, डॉ. दिलीपराव चव्हाण, पंजाबराव देसाई, रघुनाथ माटेकर, जयवंत शेलार, राजेश चव्हाण, जयवंत देसाई, सीमा मोरे, नामदेव रामीष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई यांनी विकासकामाचा पाढा वाचत साहेबांच्या प्रयत्नातून काळगाव गणाला सुमारे 17 कोटीच्यावर विकासकामे मिळाली असल्याचे सांगितले. प्रास्ताविक सरपंच जयश्री मुट्टल यांनी केले. आभार सुवर्णा सावंत यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)