विरोधकांनी घेतली राज्यपालांची भेट…

मुंबई – विधानसभा अध्यक्षावर विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव उधळून लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला. अध्यक्षांविरोधात अश्विास प्रस्ताव मांडण्याची संधी न दिल्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांनी वस्तूस्थिती सांगणारे निवेदन दिले. अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठराव दिशाभूल करून मांडला.

मुख्यमंत्र्यांनी दिलेले उदाहरण हे मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठरावाशी संबंधित असून त्याचा आम्ही अध्यक्षांना दूर करणे या प्रस्तावाशी संबंध नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचे कृत्य लोकशाहीचा गळा घोटणारे असून विरोधी पक्षाची गळचेपी करणारे असल्यामुळे आपणाकडून आम्हाला सरंक्षण द्या, अशी मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)