विरोधकांना आतापासूनच पराभव दिसू लागला -नरेंद्र मोदीं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी साधला संवाद

कोल्हापूर: विरोधकांना आगामी लोकसभा निवडणुकीतील आपला पराभव आत्ताच दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीपूर्वीच आपल्या पराभवाची कारणे शोधली आहेत. हे लोक आतापासूनच ईव्हीएमवर दोषारोप करून ईव्हीएमला खलनायक ठरवत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक जिंकायची इच्छा आहे. पण जेव्हा काहीच पक्षांना जनतेचा आशीर्वाद मिळतो. तेव्हा ते वैतागतात. ते जनतेला मुर्ख समजतात, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगाविला.

-Ads-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सातारा आणि दक्षिण गोव्यातील भाजपाच्या बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच बूथ प्रमुखांनी विचारलेल्या प्रश्नाला मोदींनी उत्तरे दिली.

मोदी म्हणाले, देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र भाजपाने देशातील सव्वाशे करोड लोकांना एकत्र आणले आहे. आम्ही या देशवासीयांसाठी एकत्र आलो आहोत. मात्र कोलकाता येथे एकत्र आलेले विरोधक आपल्या वंशांना पुढे आणत आहेत. तिकडे धनशक्ती आहे, तर भाजपाकडे जनशक्ती आहे, असे मोदी म्हणाले.
कोलकात्याच्या परेड ग्राऊंडवर शनिवारी ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकत्र घेऊन महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लक्ष केले.


शेतक-यांना बारा हजार कोटींचा मोबदला

कॉंग्रेस सरकारच्या मागील 15 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कृषी विम्यासाठी 450 कोटी रुपये भरले होते. त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना एक हजार चारशे कोटी रुपये मिळाले. मात्र, भाजपच्या प्रधानमंत्री कृषी विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला. विमा योजनेत शेतकऱ्यांनी एक हजार सहाशे कोटी रुपये भरले. त्या मोबदल्यात शेतक-यांना बारा हजार रुपये कोटी देण्यात आले. एवढेच नव्हे तर कॉंग्रेसने हमीभावाने केवळ 450 कोटी रुपयांचे धान्य खरेदी केले. भाजप सरकारने केवळ चार वर्षांत आठ हजार पाचशे रुपयांचे धान्य खरेदी केले, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)