हैदराबाद – देशात एनडीए सरकारच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांची एक भक्कम आघाडी उघडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यातून एक भक्कम आघाडी उदयाला येईल असे कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी म्हटले आहे. यासंबंधात आंधप्रदेशचे नेते चंद्राबाबु नायडू जे प्रयत्न करीत आहे त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे असे ते म्हणाले. या आघाडीचा मुख्य आश्रयदाता हा कॉंग्रेस पक्षचे असल्याचे स्वत: नायडू यांनी अलिकडेच मान्य केले आहे त्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
या आघाडीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्या नावाचा पुरस्कार केला जाणार आहे काय असे विचरता ते म्हणाले की राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान बनण्याची पुरेपुर क्षमता आहे. येत्या पाच राज्यातील निवडणुकात कॉंग्रेसला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. या यशा नंतर त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानपदाच्या विषयावरून विरोधकांमध्ये ऐक्य झाले नाही तर काय करणार असे विचारता ते म्हणाले की या विषयावरून सर्वच पक्षांमध्ये सहमती घडवून आणली जाईल. हा काही आघाडी तुटेल इतका गंभीर प्रश्न नाही असेही त्यांनी नमूद ेकले. भाजपप्रणित एनडीए आघाडीतून अनेक पक्ष सध्या निघून जात आहेत याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा