विरोधकांची जबाबदारी आत्तापर्यंत आम्हीच खांद्यावर घेतली: शिवसेना

भारत बंद बाबत शिवसेनेची प्रतिक्रीया

आता झोपेतून जागे झालेले विरोधक प्रबळ व्हावेत ही अपेक्षा

मुंबई: भारत बंदच्या निमित्ताने विरोधकांवर टोमणे मारताना शिवसेनेने म्हटले आहे की महागाई आणि भाववाढीच्या विषयावर त्यांना उशिरा जाग आली आहे. आत्तापर्यंत आम्हीच विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडली आहे आता विरोधकांना जाग येऊ लागली असून त्यांची शक्ती वाढली पाहिजे अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे. पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखातून त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. देशातील महत्वाच्या प्रश्‍नांवर आंदोलने करण्याची विरोधकांची नेमकी ताकद किती हेही आम्हाला पाहायचे आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून इंधन दरवाढ सुरू आहे, पण विरोधकांना आत्ता जाग आली असल्याचा टोमणाही यात पक्षाने मारला आहे. लोकांच्या प्रश्‍नावर विरोधकांची नेमकी भूमिका काय आहे याचीही जाणिव होण्याची गरज आहे. मध्यंतरी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून एक दिवस भाजप नेते होऊन दाखवा असे विधान केले होते त्याचा संदर्भ देऊन शिवसेनेने म्हटले आहे की, भाजप नेता होण्यापेक्षा आता सामान्य माणूस म्हणून जगणे आज अधिक अवघड आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्‍यक वस्तुंची महागाई प्रचंड वाढली असल्याने सामान्य माणसाचे जीवन असह्य झाले आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)