विरोधकांचा मोर्चा हा राजकीय स्टंट : रत्नप्रभा घाडगे

खटाव – घरपट्टी व पाणीपट्टीसाठी विरोधकांनी काढलेला मोर्चा हा केवळ राजकीय स्टंट असल्याच मत सरपंच सौ. रत्नप्रभा घाडगे यांनी ‘प्रभात ‘ला दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. दहा वर्षात ग्रामपंचायतीने विविध विकास कामे केली आहेत. ग्रामस्थांचे विकास कामांकडे दुर्लक्ष व्हावे व आपले अपयश झाकले जावे, यासाठी हा प्रयत्न आहे. घरपट्टी व पाणीपट्टी संदर्भात 31 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार प्रशासनाने कर आकारणी केली आहे. त्यास ग्रामसभेने मान्यता दिली आहे. त्या ग्रामसभेत विरोधक होते. त्यावेळेस आपण गप्प का होता. आत्ताच हा मुद्दा आपण हा मुद्दा का घेतला. वास्तविक नविन दराने आकारलेली घरपट्टी कमी झालेली आहे.

वडूज, पुसेगाव, मायणी या गावांची पाणीपट्टी 1200 आहे तर खटावची 900 रूपये आहे. महाजल योजना येरळा नदीतून केली पाहिजे, असा अपप्रचार का करता ? सध्या येरळा नदीची अवस्था खटावकरांना माहित आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरूपी पाणीसाठा आहे तेथून पाणी योजना करा असे शासनाचे निर्देश आहेत, हे आपणास माहीत नाही का? येरळा नदीला बारमाही पाणी असते तर विविध गावांनी येरळवाडी, नेर व दरजाई तलावातून योजना केल्या असत्या. जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा विकास साधल्यास मोर्चाची वेळ येणार नाही.

आम्ही विकास करण्यास सक्षम असल्याचे घाडगे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहेत.विरोधकांनी आगामी निवडणूकीत येताच विनाकारण ग्रामपंचायतीवर आरोप करू नयेत अन्यथा खटावचे नागरिक आपल्याला कायमस्वरूपी विरोधकाची भूमिका देतील, असा इशारा पत्रकात दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)