विरोधकांचा आज भारत बंद

इंधन दरवाढ आणि खालावलेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात असंतोष

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेल सह एलपीजी गॅस सिलिंडरमधील भाववाढीच्या निषेधार्थ तसेच मोदी सरकारच्या फसलेल्या आर्थिक नितीच्या विरोधात कॉंग्रेसने सोमवारी भारत बंद पुकारला असून देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्याला पाठिंबा दिला आहे. दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, जनता दल सेक्‍युलर, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र नव निर्माण सेना इत्यादी पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. तथापी कम्युनिस्ट पक्षांनी आपला बंद स्वतंत्रपणे पुकारला असून तोही उद्याच आहे. तृणमुल कॉंग्रेसने मात्र बंद पासून दूर राहण्याचे ठरवले आहे.

या बंदमुळे देशातील सामान्य जनजीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. बंद यशस्वी करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे तसेच यानिमीत्ताने कोठेही कायदा आणि सुव्यवस्थेचे उलंलघन होऊ नये यासाठी पोलिसांनीही ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. कॉंग्रेस पक्षाने या बंदचा कालावधी सकाळी 9 ते दुपारी 3 असा असेल असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र, बिहार, पंजाब, तामिळनाडु, कर्नाटक, ओडिशा या विरोधकांचा प्रभाव असलेल्या राज्यांमध्ये बंदचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करून नागरीकांना दिलासा द्यावा, इंधनचा समावेश जीएसटी मध्ये करावा या कॉंग्रेसच्या प्रमुख मागण्या आहेत. मोदी सरकारने तब्बल 12 वेळा इंधनावरील उत्पादन शुल्कात वाढ करून जनतेची तब्बल अकरा लाख कोटी रूपयांची लूट केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती कमी झालेल्या असतानाही त्याचा लाभ जनतेला न देता सरकारने आपलीच तिजोरी भरण्याचे काम केले आहे असा कॉंग्रेसचा आरोप आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)