विरोधकांकडून समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – ‘काही पक्षांना शांतता आणि विकास नकोय. त्यांना केवळ देशात अराजकता हवी आहे. देशात कलह हवा आहे. देशात जेवढा असंतोष निर्माण होईल, तेवढा त्यांना राजकीय फायदा होणार आहे. खरे तर अशा लोकांना देशाचं वास्तवच माहीत नाही. संत कबीर, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या या देशाच्या स्वभावाचा यांना थोडासाही अंदाज नाही,’ असा टोला मोदी यांनी विरोधकांना लगावला.

समाजातील वाईट प्रथा नष्ट व्हाव्यात असं विरोधकांना वाटत नाही, त्यामुळेच त्यांनी तीन तलाकला विरोध केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोदी यांनी यावेळी गेल्या चार वर्षात केंद्र सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखाच उत्तर प्रदेशच्या जनतेसमोर ठेवला. सध्या देशात महापुरुषांच्या नावावरून राजकारण सुरू आहे. विरोधकांकडून महापुरुषांच्या नावाचा उपयोग समाजांमध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. उत्तर प्रदेशातील मगहर येथे संत कबीर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फुले, गांधी आणि डॉ. आंबेडकर समाजात समानता टिकून राहावी, यासाठी प्रयत्नशील होते. बाबासाहेबांनी देशाच्या संविधानातून सगळ्यांना समानतेचा अधिकार बहाल केला. परंतु देशात असे काही पक्ष आहेत ते अशांतता नांदावी, यासाठी प्रयत्न करत असतात. यावेळी मोदींनी आणीबाणीवरून कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली. गांधी कुटुंबीयांनी स्वतःच्या फायद्याचंच राजकारण केल्याची टीकाही मोदींनी केली.

मगहर येथे पोहोचल्यानंतर मोदी यांनी संत कबीर यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. संत कबीर यांची आज 620वी पुण्यतिथी आहे. संत कबीर यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केल्याचा उल्लेखही यावेळी मोदींनी केला आहे.
“देशात आणीबाणी लागू होऊन 43 वर्ष झाली आहेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.

आज त्याकाळातील आणीबाणीचे विरोधक आणि समर्थक गळ्यात गळा घालून एकत्र आले आहेत. केवळ सत्तेच्या लालसेपोटीच विरोधक एकत्र आले आहेत,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीवर टीका करत 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)