नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत व्हिजन 2022 सादर करण्यात आले. दरम्यान, भाजपने विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दुसऱ्या दिवसाचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडला.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. विरोधकांकडे ना नेता, ना रणनीती यापैकी काहीही नसल्याचे जावडेकर म्हणाले. तसेच, हताश झालेल्या विरोधकांकडून सध्या नकारात्मक राजकारण सुरू झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतात भाजपाची १९ राज्यात सत्ता आहे. ३५० खासदार आणि १५०० आमदार आणि १९ राज्य भाजपाकडे असून आम्ही पुन्हा एकदा २०१९ ला सर्वात जास्त मात्तानी निवडून येऊ, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)