आज गणरायाचे आगमन होत आहे. आद्यदैवत गणपती हा विघ्नहर्ता आहे. आपल्या भक्तांच्या हाकेला तो नेहमी धावून येतो असे बोलले जाते. भारताचा माजी धडाकेबाज  सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग हा देखील गणरायाचा भक्त आहे.

विरेंद्र सेहवाग यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर खात्यावरून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते ट्विटमध्ये असे म्हणाले, देव विघ्नहर्ता विनायक तुमच्या सर्वांच्या मार्गातील अडथळे दूर करतील आणि तम्च्यावर आनंदाचा वर्षाव करतील, अशी प्राथर्ना करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया ”

भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग क्रिकेटमध्ये जसा वेगाने धावा करायचा तसाच तो ट्विटरवर देखील वेगाने ट्विट करतो आहे. तो दररोज काहीतरी ट्विट करून चाहत्यांना आनंद देत असतोच. या ट्विटमध्ये त्यांनी फलंदाजी करणाऱ्या गणरायाचा फोटो ट्विट केला आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)