मुंबई : वसईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच दिवसात दोन महिलांची हत्या झाली. या महिलांचे मृतदेह एकाच पद्धतीने जाळल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. विरारजवळच्या कनेर भागातील जंगलात गुरुवारी एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला.

महिलेची आधी हत्या करुन तिचा मृतदेह जाळल्याचा संशय पोलिसांना आहे. मृतदेह पूर्ण जळाला होता, केवळ कवटीच दिसत होती. दरम्यान, त्याआधी रविवारी विरारमध्येच एका महिलेचा मृतदेह अशाच पद्धतीने जळालेल्या अवस्थेत सापडला होता. दोन्ही घटनांनी वसई-विरारमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांची नोंद करुन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)