भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथी कसोटी भारताने गमावली आणि त्यासह मालिका ही गमावली. ही मालिका जिंकण्याची आणि कसोटी क्रिकेटमध्ये  आपली मक्तेदारी आणखी मजबूत करण्याची भारताने संधी गमावली. या पराभवाचे खापर अनेक गोष्टींवर फोडले जात आहे. त्यात कधी अयोग्य संघ निवड, विराटाचे दिशाहीन नेतृत्व, सलामीवीरांचे अपयश ही  त्यापैकी काही करणे.

परंतु, या सर्व बाबींचा विचार करूनही भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी विराट ची पाठराखण केली आहे. ते म्हणाले की, “जेव्हा तुम्ही पाच फलंदाजांसहित खेळत असता तेव्हा एका फलंदाजावर अवलंबून राहू शकत नाही, विराट मोठी शतकी खेळी साकारेल. तो हे नेहमी नाही करू शकत . तो माणूसच आहे. ”

विराटने या पाच सामन्याच्या मालिकेतील चार कसोटी सामन्यात ६८ च्या सरासरीने  ५४४ धावा केल्या आहेत. एक कसोटी सामना अजून शिल्लक आहे. परंतु, त्याअगोदरच मालिका ३-१ अशी इंग्लंडच्या खिशात गेली आहे. भारताने मालिका गमावली असली तरी चांगल्या प्रदर्शनामुळे विराट कोहली कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत कारकिर्दीतील सर्वोत्तम ९३७ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)