विराट चुकीच्या निर्णयाचा बळी

पर्थ: भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक साजरे केल्यावर भारतीय संघ आघाडी घेण्याचे स्वप्ने पाहत होता. 123 धावांवर खेळताना विराटने पेट कमिन्सच्या यष्टीबाहेरील एका चेंडूला डवचले आणि चेंडू बॅटचा कडा घेऊन स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पीटर हॅंड्‌सकोम्बच्या दिशेने गेला. त्याने तो झेल टिपला. परंतु, तो झेल अचूकरीत्या पकडला गेला आहे की नाही याबाबत दोन्ही पंचामध्ये मतभेद असल्याने तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली गेली. रिप्लेमध्ये झेल चुकीच्या पद्धतीने टिपला गेला असल्याचे दिसत असताना देखील तिसरे पंच नायजेल लॉन्ग यांनी विराटला बाद ठरवले. त्यामुळे या निर्णयावर सर्वत्र टीका होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)