विराट कोहली तिसऱ्या कसोटीला मुकणार? 

लंडन: आधीच अडचणीत सापडलेल्या भारतीय क्रिकेट संघासमोरील संकट वाढतच चालले आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील दुस-या सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत आहे. लॉर्डस कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली क्षेत्ररक्षणासाठी मैदानातच उतरला नाही.
पाठीच्या दुखापतीमुळे विराटने क्षेत्ररक्षण करण्याचे टाळले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्धच्या तिस-या कसोटीत विराट खेळणार नसल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रातही विराट बराच काळ सीमारेषेबाहेर बसून होता. पुरेशा विश्रांतीनंतर तो चौथ्या दिवशी मैदानात परतेल असे वाटले होते, परंतु त्याने विश्रांती करणेच पसंत केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)