विराट कोहली अव्वल स्थानी कायम

आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारी

दुबई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले असून 2018 सालचा निरोप घेतला आहे. कोहलीने 931 गुणांसह फलंदाजांमध्ये, तर रबाडाने 880 गुणांसह गोलंदाजांमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये बांगलादेशचा शकिब अल हसन हा 415 गुणांसह अग्रस्थानावर कायम आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेलबर्न कसोटीत 82 धावांनी खेळी करूनही कोहलीच्या खात्यातील तीन गुण कमी झाले आहेत. मात्र, दुसऱ्या स्थानावर असलेल्या केन विलियम्सनपेक्षा त्याचे 34 गुण आधीक आहेत. त्यामुळे त्याने आपला अव्वल क्रमांक कायम राखला. कोहलीने 2018 मध्ये 1322 कसोटी धावा केल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्हन स्मिथला अव्वल स्थानावरून पायउतार केले. त्यानंतर आतापर्यंत 135 दिवस कोहली अव्वल क्रमांकावर कायम आहे. तर, दुसरीकडे गोलंदाजांच्या क्रमवारित दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस होती.

मात्र, रबाडाने 6 गुणांच्या आघाडीसह क्रमवारित बाजी मारली. यंदाच्या वर्षात अव्वल स्थान पटकावणारा रबाडा या युवा खेळाडू ठरला आहे. त्याने या वर्षात 178 दिवस हे स्थान अबाधित राखले आहे. त्याने 10 सामन्यांत 52 विकेट घेतल्या आहेत. भारताच्या चेतेश्वर पुजाराने मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावातील शतकानंतर क्रमवारीत चौथे स्थान कायम राखले आहे, यष्टिरक्षक रिषभ पंतने 10 स्थानांनी झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम 38वे स्थान पटकावले. पदार्पणात छाप पाडणाऱ्या मयांक अग्रवाल 67 व्या स्थानावर आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)