विराट कोहलीकडून मुंबईतील आलिशान घराचा व्यवहार रद्द

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मुंबईच्या वरळीमधल्या आलिशान घराचा व्यवहार रद्द केला असल्याचे सांगण्यात येत आहे. विराट हे घर आपल्या मनाप्रमाणे तयार करत होता. पण आता हे घर खरेदी करण्याचा विचार त्याने बदलल्याचे वृत्त समोर आहे.

विराट कोहलीने 2016 मध्ये ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्सच्या ओमकार 1973 प्रोजेक्टमधील 34 कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी केले होते. टॉवर Cच्या 35 व्या मजल्यावरील या 7000 चौरस फुटांच्या फ्लॅटमध्ये सुपर लक्झरियस सुविधा असाव्यात, असे विराटची इच्छा होती. या घरासाठी चार गाड्यांचे पार्किंगही होते. परंतु आता हे घर खरेदी करण्यात त्याला इंटरेस्ट नसल्याचे समोर आले आहे.

या घराचे बांधकाम अद्याप सुरु आहे. या फ्लॅटचा व्यवहार तीन दिवसांपूर्वी अर्थात 20 मार्च रोजी रद्द करण्यात आला आहे. प्रॉपर्टी मार्केटच्या सूत्रांच्या माहितीनुसार, विराट आता एक पेंटहाऊस शोधत आहे. वांद्रे आणि वर्सोवा या ठिकाणी अशाप्रकारचे घर खरेदी करण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न आहे. विराट सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत वरळीमध्ये भाड्याने राहत आहे. वरळीत भाड्यावर घेतलेल्या घरासाठी कोहली महिन्याकाठी 15 लाख रुपये मोजत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)