विराट-अनुष्काने केली केरळ पूरग्रस्तांसाठी मदत

महापुराने थैमान घातलेल्या केरळला जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातूनही केरळला मदत पाठवली जात आहे. अनेक उद्योजक, राजकीय पक्ष, सिनेअभिनेते, खेळाडू आणि संस्था केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. अनुष्का आणि विराट यांनीही केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून अन्न साम्रगी आणि औषधे प्रदान केली आहेत.

बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी 51 लाख रूपयांची मदत केली आहे. त्यानंतर आता बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे सुध्दा केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. अनुष्का आणि विराट यांनी केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून अन्न साम्रगी आणि औषधे प्रदान केली आहेत.

-Ads-

दरम्यान, याआधी कर्णधार विराट याने इंग्लड विरूध्द तिसऱ्या कसोटीचा विजय हा केरळ पूरग्रस्तांना समर्पित केला होता. तसेच एका सामन्याचे मानधनही मदत म्हणून जाहीर केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)