विराटला मिळणार ‘खेलरत्न’ पुरस्कार ?

नवी दिल्ली: राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. बीसीसीआयने आज त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. तर, माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याचे नाव द्रोणाचार्य पुरस्कारासाठी सुचविण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी २०१६ सालीही त्याचं नाव पुढं करण्यात आलं होतं. मात्र, तेव्हा त्याला हा  पुरस्कार मिळू शकला नव्हता. यंदा या पुरस्कारासाठी त्याची निवड झाल्यास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यानंतर ‘खेलरत्न’ मिळवणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरेल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)