विराटमुळे आरसीबीला ११ कोटींचा झटका !

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि  बॉलीवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना एकत्र पाहण्याचा योग येणार होता. ते दोघे एका जाहिरातीत दिसणार होते. मात्र ते शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. ही जाहिरात आयपीएलच्या सीझनसाठी बनवण्यात येणार होता.  मात्र विराट कोहलीने दीपिका पदुकोणसोबत जाहिरात करण्यास नकार दिला.

एका संकेतस्थळानुसार, विराटच्या या निर्णयामुळे आयपीएलमधील आरसीबीची ११ कोटी रुपयांची डील होऊ शकली नाही. गो आयबीबो कंपनीला विराट आणि दीपिकासोबत जाहिरात करायची होती. आरसीबीसोबत हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र अखेरच्या क्षणी विराटने जाहिरात करण्यास नकार दिला. आरसीबीच्या सूत्रांनी हे डील कॅन्सल झाल्याची माहिती दिली आहे.

विराटने दीपिकासोबत जाहिरात करण्यास नकार का दिला ? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. गोआयबीबोला आयपीएलसाठी विराटसोबत जाहिरात करायची होती. त्यांनी या जाहिरातीत त्यांची ब्रँड अॅम्बेसिडेर दीपिकालाही समाविष्ट करुन घेतली. या कंपनीने दीपिकाला गेल्या वर्षी ब्रँड अॅम्बेसिडेर बनवले होते. यानंतर विराटने ही जाहिरात करण्यास नकार दिला. मीडिया रिपोर्टनुसार, विराटच्या मते कंपनीच्या जाहिरातीत ब्रँड अॅम्बेसिडेर सामील होत असेल तर ही आरसीबीची जाहिरात नसेल तर कंपनीची असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)