विराटने दीपिकासोबत जाहिरात करण्यास नकार का दिला?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा धडाकेबाज कॅप्टन विराट कोहलीने आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत जाहिरात करण्यास नकार दिला. त्यामुळे विराटने दीपिकासोबत जाहिरात करण्यास नकार का दिला? असा प्रश्न आता पुढे आला आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, विराटच्या या निर्णयामुळे आयपीएलमधील आरसीबीची ११ कोटी रुपयांची डील थांबली आहे.

एका कंपनीला विराट आणि दीपिकासोबत जाहिरात करायची होती. आरसीबीसोबत हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र अखेरच्या क्षणी विराटने जाहिरात करण्यास नकार दिला.  एका कंपनीला आयपीएलसाठी विराटसोबत जाहिरात करायची होती. त्यांनी या जाहिरातीत त्यांची ब्रँड अ‍ॅम्बेसिडेर दीपिकालाही सहभागी करुन घेतले. या कंपनीने दीपिकाला गेल्या वर्षी ब्रँड अ‍ॅम्बेसिडेर केले होते. यानंतर विराटने ही जाहिरात करण्यास नकार दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)