विराटच्या नावावर आणखी एक विक्रम…

मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार आणि वर्षातील सर्वश्रेष्ठ आयसीसी क्रिकेटर विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला आहे. जोहान्सबर्ग कसोटीमध्ये 12 गुणांची कमाई करत वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रायन लारालाही मागे टाकले आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी कोहलीचे ९०० गुण होते. तिसरा कसोटी सामना त्याने 900 गुणांनी सुरू केला. सामन्यातील पहिल्या डावात त्याने ५४ आणि दुसऱ्या डावात ४१ धावा करून १२ गुणांची कमाई केली. आता त्याचे ९१२ गुण झाले असून, तो आयसीसीच्या सर्वकालीन कसोटी क्रमवारीत २६ व्या स्थानी आहे. तर डॉन ब्रॅडमॅन ९६१ गुणांसह अव्वल आहेत.
सध्याच्या जागतिक कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी असलेला स्टीव्ह स्मिथ ९४७ अंकांसह सर्वकालीन यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर कोहलीने 31 व्या स्थानावरून 26 व्या स्थानावर उडी मारली आहे. त्याने ब्रायन लारा (९११), केव्हिन पीटरसन (९०९), हाशिम अमला (९००), चंद्रपॉल (९०१) आणि मायकल क्लार्क (९००) यांना मागे टाकले आहे. गुणांच्या बाबतीत विराट कोहली आता सुनील गावसकर यांच्या जवळपास पोहोचला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)