विराटच्या नवीन लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला मोठी सुट्टी मिळाली आहे. २३ तारखेनंतर भारतीय संघ सराव सत्रात सहभागी होणार आहे. यामुळेच संघातले खेळाडू आपापल्यापरीने सुट्ट्याचा आनंद घेताना दिसत आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय ती विराटच्या नवीन लुकची.

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नवीन हेअरस्टाईलचा फोटो शेअर केला आहे. विराटची प्रत्येक स्टाईल चर्चेचा विषय ठरते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताचा तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार असून भारतीय संघ रविवारपासून सराव सत्रात सहभागी होणार आहे. हा कसोटी सामना ‘बॉक्सिंग डे’ सामना आहे. क्रिसमस नंतर खेळण्यात येणाऱ्या सामन्याला ‘बॉक्सिंग डे’ असे म्हटले जाते. तसेच हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी असते. ‘बॉक्सिंग डे’ सामन्यात कोण बाजी मारतो हे पाहणे औसूक्त्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)