विराटचा चाहता सुरक्षा भेदून थेट मैदानात आला

डुब्लिन : भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडवर १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवत दोन सामन्यांची मालिका २-० सहज जिंकली. पण शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यातील विजयापेक्षा मैदानावर घडलेल्या या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर लोकेश राहुलने फटकेबाजी करून भारताला सकारात्मक सुरुवात करून दिली. मात्र सलामीला आलेला कर्णधार विराट कोहली अवघ्या ९ धावांवर माघारी परतला आणि भारताची अवस्था १ बाद २२ अशी झाली. त्यानंतर राहुल आणि सुरेश रैना यांनी ५७ चेंडूत १०६ धावांची भागीदारी रचून संघाचा पाया मजबूत केला. डावाच्या अखेरीस हार्दिक पंड्याने ९ चेंडूंत ३२ धावाची वादळी खेळी साकारून संघाला दोनशेचा पल्ला पार करून दिला. प्रत्युत्तरात आयर्लंडला केवळ ७० धावाच करता आल्या. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना पॅव्हेलियनमधून एक प्रेक्षक थेट मैदानावर आला आणि कोहली समोर येऊन उभा राहिला. कोहलीही सुरुवातीला हडबडला, परंतु त्याने त्वरित त्या चाहत्याला समजावून मैदान सोडण्यास सांगितले. यावेळी चाहत्याच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावणारा नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)