विराटकडून गोलंदाजांना पूर्ण स्वातंत्र्य – उमेश यादव

नवी दिल्ली, दि. 17 – क्रिकेटमध्ये प्रत्येक वेगवान गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करण्यासाठी चांगला कर्णधार आणि त्या कर्णधारकडून स्वातंत्र्य मिळणे गरजेचे असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना कर्णधार विराट कोहलीकडून आपल्याला हे स्वांतत्र्य मिळत असल्यामुळे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आनंदी आहे.
विराट कोहलीचे नेतृत्व गोलंदाजांसाठी उत्तम आहे. सामन्यात गोलंदाजीचा स्पेल देत असताना, क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावयाचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य कोहलीकडून गोलंदाजांना मिळते. त्याआधी कोहली गोलंदाजाची योजना समजून घेतो, त्यानुसार मैदानात क्षेत्ररक्षण कसे हवे आहे, यासंदर्भात खेळाडूला विाचारतो, त्यानंतर तुमच्या पाठिशी राहुन योजना प्रत्येक्षात आणतो, असे उमेश यादवने सांगितले.
दरम्यान गोलंदाजाची योजना यशस्वी न झाल्यास कोहली गोलंदाजाला दुसरा पर्याय वापरण्याचा सल्ला देतो. अर्थातच कोहलीकडे प्लॅन बी तयार असतोच, असेही यादव म्हणाला.
गेल्या काही दिवसांत उमेश यादवने आपल्या आउटस्वींग गोलंदाजीने फलंदाजांना त्रस्त केले आहे. तसेच आगामी काळात आपली गोलंदाजी आणखी घातक होणार असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते दिसून येईल. तसेच 140 किमी ताशी वेगाने आपण आउटस्वींग गोलदाजी करू शकतो, असे सांगताना उमेशने आपण इनस्वींग गोलंदाजी सुधारण्यावर भर देत असल्याचे सांगितले.
बांगला देशविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात यादवने शानदार कामगिरी केली होती. बांगला देश संघाचा कर्णधार शकिब अल हसन याने कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यादवने केलेल्या शानदार गोलंदाजीचे कौतुक केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)