विरळीत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

लोणंद : अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना मान्यवर.

म्हसवड, दि. 12 (प्रतिनिधी) – विरळी (ता. माण) येथे साहित्यिक थोर समाजसुधारक क्रांतिकारक साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब भोसले, देवेंद्र देवकुळे यांनी प्रभावीपणे समाजप्रबोधन करताना ऐक्‍य आणि संस्कृती याचे महत्व विशद केले. आपल्या समाजातील दुहीची शोकांतिका बोलून दाखवली.
सकट भंडारे केंगार या तिन्ही समाजातील तरूण एकत्र येऊन अण्णाभाऊंची जयंती साजरी करून एक नवीन परंपरा सुरू केली असून या जयंती उत्सवाचे औचित्य साधून मयूर बबन सकट, अभिषेक विनोद केंगार, सुवर्णा बाळू केंगार, निकिता अरूण केंगार या विद्यार्थ्यांचा विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई प्रबोधन गीतमंच गोमेवाडी यांच्या बहारदार गीत गायनाने झाली. शरद गोरड, विकास केंगार, पूजा दिलीप सकट यांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. बाळकृष्ण सकट यांनी केली. भोपाल भंडारे यांनी आभार मानले. यावेळी सकट, भंडारे, केंगार यांच्या बरोबरच मोठ्या प्रमाणात बहुजन समाजातील लोक उपस्थित होते. यावेळी सर्व विरळी ग्रामस्थांच्यावतीने विशेष सामाजिक कार्याबद्दल प्रा. बाळकृष्ण चंद्रकांत सकट यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)