विम्याच्या पैशांसाठी बहिणीचा खून

file photo

पिंपरी – तब्बल आठ महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणात या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. विम्याची रक्कम आपणाला मिळावी, यासाठी सख्या भावानेच बहिणीचा खून करून बनाव केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

जॉन डॅनियल बोर्डे (वय-40 रा. रहाटणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संगीता हिवाळे (वय-44) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना 9 सप्टेंबर रोजी वाकड येथे मध्यरात्री घडली होती. बोर्डे याने आपली बहीण संगीता हिचा आधी खून केला आणि नंतर तिचा हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करत गाडीमध्ये घालून रुग्णालयात नेण्याचे नाटक केले. दरम्यान, गाडीला आग लावून देऊन गाडी जळाल्याने अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संगीता यांच्या नावावर 30 लाखांचा विमा होता. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कमेवरूनही जॉन सातत्याने संगीताशी वाद करत होता. सायमन यांच्या शाळेची फी भरण्यावरून संगीता आणि जॉन यांच्यात वाद झाला. या वादामध्ये जॉनने संगीताचे डोके जमिनीवर आदळल्याने संगीताच मृत्यू झाला. हे लक्षात आल्यानंतर जॉनने घटनास्थळावरून पळ काढला. थोड्यावेळाने पत्नीचा फोन आल्याचे दाखवित जॉन घरी आला व रक्तदाबामुळे संगीता जमिनीवर पडल्याचे सांगून तिला रुग्णालयात घेवून जाण्याचा बहाणा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)