विम्बल्डन : मार्टिना हिंगीस-जेमी मरे जोडी मिश्र दुहेरीत विजेते

 हेन्‍री कॉन्टिनेन व हीथर वॉटसन जोडीवर सहज मात
लंडन – इंग्लंडचा जेमी मरे आणि स्वित्झर्लंडची माजी टेनिससम्राज्ञी मार्टिना हिंगीस या अग्रमानांकित जोडीने सलग तिसऱ्या वेळी सरळ सेटमध्ये विजयाची नोंद करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली. जेमी मरे-मार्टिना हिंगीस जोडीने अपेक्षेपेक्षा अत्यंत एकतर्फी ठरलेल्या मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत फिनलंडचा हेन्‍री कॉन्टिनेन आणि इंग्लंडची हीथर वॉटसन या बिगरमानांकित जोडीचे आव्हान 6-4, 6-4 असे विनासायाम संपुष्टात आणले.

जेमी मरे-मार्टिना हिंगीस जोडीने त्याआधी उपान्त्य फेरीच्या लढतीत मार्सेलो डिमोलिनर व मारिया जोस सॅंचेझ या बिगरमानांकित जोडीचे आव्हान सरळ सेटमध्येच अंतिम फेरी गाठली होती. तसेच विजेत्या जोडीने उपान्त्यपूर्व फेरीत केन स्कुपस्की व जोसलिन रे या इंग्लंडच्या जोडीला पराभूत करताना यजमानांचे आव्हान संपुष्टात आणले होते. तर त्याच वेळी उपान्त्यपूर्व फेरीत भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इव्हान डॉडिग या चतुर्थ मानांकित जोडीला पराभूत करणाऱ्या हेन्‍री कॉन्टिनेन आणि हीथर वॉटसन जोडीने ब्राझिलचा ब्रूनो सोरेस व रशियाची एलेना व्हेस्निना या द्वितीय मानांकित जोडीवर खळबळजनक विजय मिळवून अंतिम फेरी गाठली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)