विमेन्स प्रीमियर लीग क्रिकेट : एचपी सुपर किंग्स, तोरणा टायगर्स संघाची आगेकूच 

हेमंत पाटील विमेन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 
पुणे- एचपी सुपर किंग्स, तोरणा टायगर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करताना हेमंत पाटील विमेन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. हेमंत पाटील स्पोर्टस फाउंडेशन व भारत अगेन्स्ट करप्शन यांच्या सहयोगाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सिंहगड रोड येथील व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पूनम खेमनारने केलेल्या 78धावांच्या खेळीच्या जोरावर एचपी सुपर किंग्स संघाने सिंहगड स्टार्स संघाचा केवळ 3 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना एचपी सुपर किंग्स संघाने 20 षटकांत 7 बाद 140 धावा केल्या. यात पूनम खेमनारने 57 चेंडूंत 78 व सई पुरंदरेने 29 चेंडूंत 23 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या आव्हानाचा पाठलाग करताना सिंहगड स्टार्स संघाला 20षटकात 8बाद 137धावापर्यंतच मजल मारता आली.यामध्ये सारिका कोळी 60, श्रद्धा पोखरकर नाबाद 15, सोनल पाटील 14, तेजश्री कदम 12 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. एचपी सुपर किंग्सकडून प्रियांका घोडके (3-21), तेजश्री ननावरे (1-14), प्रियांका भोकरे (1-20) यांनी सुरेख गोलंदाजी केली. सामन्याची मानकरी पूनम खेमनार ठरली.

दुसऱ्या सामन्यात श्वेता जाधव (92धावा) हिने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर तोरणा टायगर्स संघाने रायगड रॉकर्स संघाचा 72 धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. श्वेता जाधवने 61 चेंडूंत 16 चौकारांसह 92, तर नेहा बडवाईकने 41 चेंडूंत 6 चौकारांसह 44 धावा करताना पहिल्या गडयासाठी 69 चेंडूंत 102 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनंतर श्वेता जाधवने (92धावा) व चार्मी गवई नाबाद 27धावा यांनी दुसऱ्या गडयासाठी 28 चेंडूंत 50 धावांची भागीदारी करीत संघाला 192 धावांची मजल मारून दिली.

मात्र रायगड रॉकर्सचे आव्हान 20 षटकांत 5 बाद 121 धावांवर संपुष्टात आले. यात उत्कर्ष पवार 35, पार्वती बाकळे 31, कश्‍मिरा शिंदे 17 यांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. तोरणा टायगर्सकडून भूमिका फाळके (1-9), ख़ुशी मुल्ला (1-19), वैष्णवी पाटील (1-22) व रोहिणी माने (1-26)यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.

सविस्तर निकाल- 
साखळी फेरी – एचपी सुपर किंग्स- 20 षटकांत 7 बाद 140 धावा (पूनम खेमनार 78 (57), सई पुरंदरे 23(29), मनाली जाधव 2-16, वैष्णवी रावलीया 1-6, सायली अभ्यंकर 1-33, श्वेता खटाळ 1-33) वि.वि. सिंहगड स्टार्स- 20 षटकांत 8 बाद 137 धावा(सारिका कोळी 60 (42), श्रद्धा पोखरकर नाबाद 15, सोनल पाटील 14 (19), तेजश्री कदम 12, प्रियांका घोडके 3-21, तेजश्री ननावरे 1-14, प्रियांका भोकरे 1-20); सामनावीर- पूनम खेमनार;
तोरणा टायगर्स- 20 षटकांत 1 बाद 193 धावा (श्वेता जाधव 92, नेहा बडवाईक 44, चार्मी गवई 27, मानसी जाधव 1-15) वि.वि. रायगड रॉकर्स- 20 षटकांत 5 बाद 121 धावा (उत्कर्ष पवार 35, पार्वती बाकळे 31, कश्‍मिरा शिंदे 17, भूमिका फाळके 1-9, ख़ुशी मुल्ला 1-19, वैष्णवी पाटील 1-22, रोहिणी माने 1-26); सामनावीर-श्वेता जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)