विमा भरण्याच्या बहाण्याने दोन लाखाची फसवणूक

सातारा-  विमा कंपनीतून बोलतोय,असे सांगत सातारा शहरातील एकाची दोन लाखाची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दिलीपकुमार सिताराम सिंग (रा. शाहूपुरी, सध्या रा. पुणे) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सिंग यांना काही दिवसापुर्वी विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगत विमा हप्ता कधी भरणार असे विचारले. त्यानंतर तात्काळ विमा हप्ता भरा असे सांगितले. सिंग यांचा विमा असल्याने व त्याचा हप्ता थकल्याने फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीवर त्यांनी विश्‍वास ठेवला. सिंग यांनी संबंधीताला त्यांच्या सातारा येथील व्यवस्थापकाला संपर्क करण्याचे सांगितले. त्यानंतर फोनवरून बोलणाऱ्या त्या व्यक्तीने सिंग यांच्या व्यवस्थापकाला विमा हप्ता भरण्यासाठी एक बॅंक खाते क्रंमाक दिला.

-Ads-

त्यावर व्यवस्थापकाने दोन लाख चार हजार रुपये पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी विमा कंपनीतून हप्ता भरण्याची विचारणा केली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली. सिंग यांच्या व्यवस्थापकाने पैसे पाठवलेले बॅंक खाते उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील एका विनोद नामक व्यक्तीच्या नावे असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास शाहूपुरी पोलिस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)