विमान दुर्घटना: प्रवासी आणि चालक दलासह १८९ जणांचा मृत्यू

जकार्ता: इंडोनेशियाची राजधानी जर्कातामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. लायन एअरवेजचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच समुद्रात कोसळले. प्रवासी आणि चालक दलासह १८९ जण मरण पावल्यची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लायन एअरवेजचे जेटी ६१० हे विमान जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात होते. ६.२० वाजता या विमानाने उड्डाण केले व १३ मिनिटातच या विमानाचा संपर्क तुटला. यानंतर थेट विमान कोसळल्याचीच माहिती समोर आली. माहिती मिळाल्यानंतर इंडोनेशिया प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)