विमान कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करा!

घाटकोपर विमान दुर्घटनाप्रकरण : विखे-पाटील यांची मागणी
मुंबई – घाटकोपरमधील विमान दुर्घटने प्रकरणी यू वाय एव्हिएशन कंपनीचे संचालक दीपक कोठारी यांच्या विरोधात निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

विमानाला अपघात झाला त्या दिवशी हवामान प्रतिकूल होते. खराब हवामानात टेस्ट पलाईट करणे हे जोखमीचे असते. अशावेळी या विमानाने उड्डाण का केले? याची चौकशी झाली पाहिजे, असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यू वाय एव्हिएशन कंपनीच्या विमान दुर्घटनेप्रकरणी विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी पत्र लिहिले. या कंपनीचा “सेफ्टी रेकॉर्ड’ अत्यंत खराब आहे. कंपनीकडून विमान, हेलिकॉप्टर्सची योग्य देखभाल होत नाही. यापूर्वीही अपघाताची स्थिती निर्माण होऊन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींबाबत कंपनी हलगर्जीपणा करत असेल तर इतरांबाबतही बेफिकीरीची मानसिकता कंपनीकडून अवलंबवली जात असावी असा संशय घ्यायला वाव असल्याचे विखे-पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

डीजीसीएने हे विमान टेस्ट पलाईटसाठी सक्षम असल्याचे प्रमाणित केले होते. परंतु, टेस्ट पलाईटच्या दरम्यान विमानाला अपघात झाल्याने डीजीसीएने विमानाला चाचणी उड्डाणासाठी परवानगी देताना पुरेशी दक्षता घेतली नसल्याचे दिसते. त्यामुळे विमानाला उड्डाणासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र देणा-या डीजीसीएच्या अधिका-यांना निलंबित करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यू वाय एव्हिएशन कंपनीचा परवाना रद्द करून विमान दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या कंपनीचा अनुभव फक्त चार वर्षाचा आहे. उत्तर प्रदेश सरकारने भंगारात काढलेले विमान कोणती कंपनी वापरत असेल तर ती गंभीर बाब आहे. यापूर्वीही कंपनीच्या विमानांना अपघात झाला असून त्याची चौकशी का झाली नाही? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)