विमानात झोपलेल्या तरुणीशी अश्‍लील चाळे ; भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास

भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास

वॉशिंग्टन, दि. 14 – रात्रीच्यावेळी विमान प्रवासात झोपलेल्या तरुणीशी अश्‍लिल चाळे करून लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका भारतीय व्यक्‍तिला 9 वर्षांच्या कारावासाची शिक्षा अमेरिकेतील स्थानिक न्यायालयाने ठोठावली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभू राममूर्ती (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना याच वर्षी जानेवारी महिन्यांत घडली होती. या प्रकरणी 23 वर्षीय पीडित मॉडेल तरुणीने तक्रार दाखल केली होती. स्पिरीट एअरलाइन्स या विमानात प्रभूची पत्नी आणि पीडित महिला या दोघी बाजूच्या सीटवर तर प्रभू हा मधल्या सीटवर बसला होता. लास वेगासपासून या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर आरोपीने झोपेत असताना आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप तरूणीने केला होता.

या प्रकरणी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करत आरोपीला 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात केली. मात्र, न्यायालयाने त्याला 9 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. ऑगस्ट 2018मध्ये प्रभूवर हे आरोप सिद्ध झाले होते. या गुन्ह्यात 9 वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला भारतात पाठवून देण्यात येणार आहे. प्रभू राममूर्ती हा अमेरिकेतील डेट्रॉईट या उपनगरामध्ये राहतो. कामानिमित्त तो 2015 मध्ये अमेरिकेत दाखल झाला होता. प्रभू आपल्या पत्नीसह ग्रॅंड कॅनन येथे सहलीला गेला होता. त्यानंतर लास वेगास येथून पुन्हा डेट्रॉईटकडे परतताना विमान प्रवासात ही घटना घडली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)