विमानातील बिघाड, चीनवरून मोदींनी राहुल गांधींना फोन करून केली विचारपूस

हुबळी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज सकाळी दिल्लीहून हुबळी येथे जाताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान आकाशात हेलकावे घेऊ लागले. या घटनेतून राहुल गांधी थोडक्यात बचावले. काँग्रेसनं या घटनेला नवं वळण देत कोणीतरी राहुल गांधींविरोधात  घातपाताचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला. विमानात बिघाड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

दरम्यान विमानाच्या बिघाडामागे घातपाताचाही संशय व्यक्त करत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कोणत्या तरी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमान बिघाडाची राहुल गांधींशी फोनवरून चर्चा करून माहिती घेतली. या प्रकरणी संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विमानातूनच प्रवास करणारे कौशल विद्यार्थी यांनी कर्नाटकचे पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसनेही याबाबत कर्नाटक पोलिसांकडे आणि नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) तक्रार केली असल्याची माहिती आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)