विमानाची 11 लाखाची तिकिटे चुकून विकली 47 हजाराना – म्हणे नवीन वर्षाची भेट समजा 

बीजिंग (चीन ) – विमानाची 11 लाखाची तिकिटे चुकून 47 हजाराना विकली जाण्याचा प्रकार चीनमध्ये झाला आहे. कॅथे पॅसेफिक या एशियातील एका मोठ्या विमान कंपनीने सकाळी 11 लाख रुपयांची महागडी तिकिटे 47 हजार रुपये दराने विकून टाकली. ही चूक लक्षात आली तेव्हा फार उशीर झाला होता. मग कंपनीने ही स्वस्तातील तिकिटे म्हणजे नवीन वर्षाची भेट समजा असे तिकिटधारकांना सांगितले.

कंपनीने 16,000 डॉलर्सची (11 लाख रुपये) तिकिटे चुकून 675 डॉलर्सना (47 हजार 253 रुपये दराने विकली, कॅथे पॅसेफिकने व्हिएतनामहून कॅनडाला आणि अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांना बिझीनेस क्‍लासची तिकिटे इकॉनॉमी क्‍लासपेक्षाही कमी दराने विकली होती. ही आमच्याकडून चूक झाली आहे, पण अशी तिकिटे घेतलेल्या प्रवाशांनी त्यांना कंपनीकडून नवीन वर्षाचे सरप्राईझ गिफ्ट’ समजावे असे कॅथे पॅसेफिकने म्हटले आहे.

मात्र अशी किती तिकिटे विकली याची माहिती कंपनीने दिली नाही. गेल्या वर्षी हॉगकॉंग एयरलाईन्स आणि सन 2014 मध्ये सिंगापूर एयरलाईन्सने अशाच प्रकारची चूक केली होती. मात्र दोन्ही कंपन्यांनी अशा प्रकारे विकल्या गेलेल्या तिकिटांना मान्यता दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)