विमाननगर बसथांब्याजवळ बस पेटली

चालक, वाहकांच्या सतर्कतेमुळे प्रवासी बचावले

विमाननगर- नगर रोडवरील बीआरटीमधील विमाननगर बसथांब्याजवळ सकाळी दहाच्या सुमारास पीएमपीएलला भीषण आग लागून खाक झाली. चालक दादासाहेब बडे व कायम वाहक आदिनाथ आंधळे यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.गेल्या चार महिन्यांपासून पीएमपीएमएल बसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलचा प्रवास सुरक्षित आहे का, असा सवाल प्रवाशांतून उमटत आहे.

पीएमपीलएल बस निगडीवरून वाघोलीला जात होती. ही बस बीआरटी मार्गावर इनऑरबिट मॉलसमोर आल्यावर इंजिनमधून आवाज आला. थोड्या अंतरावरून बस पुढे गेल्यानंतरही इंजिनमधून धूर निघत होता. त्यावेळी चालक आणि वाहकांनी सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून उतरविले. इंजिनचे कव्हर काढेपर्यंत आगीचा भडका उडाला. त्यानंतर अग्निशमन केंद्राला माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्‍यात आणली. मात्र, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती.

बसने पेट घेतल्यानंतर प्रवाशांनी खिडकीतून उड्या टाकून जीव वाचवल्याची माहिती वाहकाकडून समजते. यावेळी काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. प्रवासी शालिनी साठे म्हणाल्या की, पीएमपीएलमध्ये प्रवास जीवघेणा झाला आहे. मागील आठवड्यात चालकने जोरात ब्रेक दाबल्यावर माझ्या हाताची बोटे फ्रॅक्‍चर झाली आहेत. पीएमपीएलचा प्रवास खूप धोकादायक झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)