विमानतळ सुरक्षेसाठी एकछत्री यंत्रणा उभारणार

मुंबई दि. 20 – जगभरातील विमानतळांना निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशातील विमानतळांच्या सुरक्षेसाठी युनिफाईड कमांडची एकछत्री सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षेची सारी जबाबदारी एकतर्फी पद्धतीने सीआयएसएफकडे दिली जाणार आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनी आज येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली.
ते म्हणाले की विमानतळांच्या सुरक्षेसाठी एक मजबूत सुरक्षा यंत्रणाअसावी यासाठी तिचे नियंत्रण एकाचे यंत्रणेकडे असण्याची गरज निर्माण झाली होती त्यानुसार हे युनिफाईड कमांड स्वतंत्रपणे नेमण्याचा प्रस्ताव आहे. या संबंधात आमची गृहमंत्रालयाशी चर्चा झाली आहे असे ते म्हणाले. जगातल्या अन्य विमानतळांच्या सुरक्षेसाठी अशी युनिफाईड कमांड कार्यरत आहे असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)