विमानतळाच्या 15 कि.मी. हद्दीत “बीमलाईट’ नाहीच!

प्रकाशझोत सोडल्यास कडक कारवाई करू : पोलिसांचा इशारा

पुणे – लोहगाव आंतराष्ट्रीय विमानतळ परिसर तसेच 15 किलोमीटर अंतरापर्यंत प्रखर प्रकाशझोत (बीमलाईट) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारचे प्रकाशझोत सोडल्यास कडक कारवाईचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

-Ads-

लोहगाव येथे हवाई दलाचा तळ तसेच पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ आहे. मागील काही वर्षांपासून पुणे शहरातून देशातील अन्य शहरे तसेच परदेशात उड्डाण करणाऱ्या विमानांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. पुण्यातून आखाती देशात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच देशाअंतर्गत उड्डाणांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे विमानतळ दिवस-रात्र सुरु असते. लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी परिसरात अनेक मोठी कार्यालये व लॉन्स विवाह समारंभ, खासगी कार्यक्रमांत सजावटीसाठी प्रखर प्रकाशझोतांचा वापर केला जातो. अशा प्रकारचे प्रकाशझोत अवकाशात सोडले जातात. लोहगाव येथील वायुक्षेत्राच्या परिसरात (एअरफिल्ड) विविध कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिले आहेत.

हवाई दलाची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तसेच नागरी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी विमाने दिवसा तसेच रात्री धावपट्टीवर उतरतात. रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण दाखविण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रक कक्षाकडून (एटीसी टॉवर) संकेतासाठी दिव्यांचा वापर करण्यात येतो. खासगी कार्यक्रमांत सोडणाऱ्या प्रकाशझोतांमुळे वैमानिकांचे डोळे दीपून गंभीर स्वरुपाची दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत हवाई दलाकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सायंकाळी 6 ते सकाळी 6 यावेळेत लोहगाव विमानतळ आणि विमानतळापासून 15 किलोमीटरच्या परिघामध्ये प्रकाशझोत सोडण्यास पुढील दोन महिने मनाई करण्यात आली आहे. आदेशाचा उल्लंघन करणारी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहपोलीस आयुक्त बोडखे यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)