विभागीय आयुक्‍तांची पहिली बैठक निष्फळ

भामा-आसखेडप्रकरण : ग्रामस्थ, महापालिकेची आज संयुक्‍त चर्चा

काम बंद केले तरी कोणी?

पुणे – भामा-आसखेड योजनेच्या बंद असलेल्या कामाच्या प्रकरणी विभागीय आयुक्‍त दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. यावेळी ग्रामस्थांनी नेमके कोणत्या कारणास्तव काम बंद केले, याचे कारण जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेसही देता आले नाही. विभागीय आयुक्तांनी आता मंगळवारी महापालिका प्रशासन आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक बोलाविली आहे. या बैठकीत महापालिका तसेच ग्रामस्थांची भूमिका ऐकूण पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

भामा-आसखेड प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी महापालिकेने जिल्हा प्रशासन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांसह ग्रामस्थांनाही साकडे घातले होते. मात्र, कोणाकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने विभागीय आयुक्तांनी बैठक घेण्याची विनंती महापालिकेने केली होती. पूर्व पुण्यासाठी भामा-आसखेड धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यात वाकी तर्फे वाडा या गावात जॅकवेल बांधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रकल्पाग्रस्तांनी हे काम अडविल्याने ते बंद होते. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या खर्चावर पडत असल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या प्रकल्पग्रस्तांची बैठक घेतली. त्यावेळी 1,700 मिमी व्यासाच्या जलवाहिनी तसेच जॅकवेलचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिली होती. त्यानंतर पुन्हा दि. 22 मार्च ते 21 एप्रिलदरम्यान या जॅकवेलचे काम आंदोलकांनी बंद पाडले होते. त्यावर काम बंद पाडल्यास आंदोलकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने हे काम सुरू करण्यात आले होते.

मात्र, त्यानंतर आता मागील महिनाभरापासून काम बंद आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी विभागीय आयुक्तांनी आज बैठक घेतली. तसेच ग्रामस्थांना शासनाकडून काय मोबदला दिला जाणार आहे, ग्रामस्थांची काय मागणी आहे याबाबत बैठकीत विचारणा केली असता, ग्रामस्थांची कोणतीही नवी मागणी नसल्याचे पालिकेने सांगितले. तर महापालिकेनेच जॅकवेलमध्ये पाणी भरल्याने काम बंद केल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. त्यामुळे नेमके काम कोणी बंद केले, यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्या विभागीय आयुक्तांनी महापालिका अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक बोलाविली असून दोन्ही बाजू जाणून घेऊन पुढी निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)