विभागीय आयुक्‍तांची देहूत विकास कामांची पाहणी

देहुरोड – श्री क्षेत्र देहू, श्री क्षेत्र आळंदी-भंडारा व सुदुंबरे येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची विभागीय आयुक्‍त दिपक म्हैसकर यांनी पाहणी केली. कामातील त्रुटी, अडचणी समजून घेत ग्रामस्थांच्या सूचनाही ऐकल्या. उर्वरीत विकास कामांचा आढावा घेत लकरात लवकर ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे देहू येथे यावेळी स्पष्ट केले.

हवेलीच्या प्रांताधिकारी ज्योती कदम, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा खेड प्रांताधिकारी आयुष प्रसाद, तीर्थक्षेत्र विकास आराखडा विशेष कार्यकारी अधिकारी उत्तम चव्हाण, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अतुल भोसले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नंदू भोईर, पिंपरी-चिंचवडचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंमभासे, पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, सरपंच उषा चव्हाण, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

नवनियुक्‍त पुणे विभागीय आयुक्‍त दिपक म्हैसकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तीर्थक्षेत्र देहूला दिलेली पहिलीच भेट होती. त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रथम देहूचा विकास आराखडा समजून घेत, बाह्यवळण रस्ते, इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेले दोन्ही पुलांची पाहणी केली. या कामांमध्ये असलेल्या समस्या, त्रुटी जाणून घेत पाहणी केली. त्यानंतर श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे भेट देत तेथील मंदिराच्या बांधकाम आणि विकास कामांची पाहणी केली. ही पाहणी झाल्यानंतर ते श्री संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शनासाठी आले. येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध कामांच्या समस्या जाणून घेतल्या. देहू-आळंदी रस्त्याच्या भूसंपादना बाबत प्रश्‍न उपस्थित केले असता, ते म्हणाले की, भूसंपादनात ग्रामस्थांनी सहकार्य करावे, त्यातील काही त्रुटी असतील, तर बाधितांनी त्या लेखी स्वरूपात प्रत्यक्ष कार्यालयात द्यावेत, त्यावर निश्‍चितपणे कार्यवाही करू असे आश्‍वासन दिले.

देहू-आळंदी रस्त्याचे भूसंपादन करून लवकरात लवकर रस्ता करावा, गाथा मंदिराजवळील बाह्यवळण मार्गावरील पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर सुरू करावा, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अथवा मोबदला त्वरीत द्यावेत, कापूर ओढ्यावरील पुलाजवळ सुरक्षिततेबाबत योग्य त्या उपायोजना कराव्यात, संस्थानच्या वतीने पालखी मुक्कामाचा पहिला व शेवटचा तळ विकसित करावा, भंडारा डोंगर येथे मंदिरासमोर बांधण्यात येणाऱ्या शौचालयाचे आरक्षणाबाबत पुर्नविचार करावा, भूमिगत विद्युत केबल वाहिन्या व पथदिवे बसवावेत, पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र स्त्रोत विकसित करावा अशा मागण्या या वेळी करण्यात आले आहेत. देहूच्या बाबतीत मात्र अपूर्ण कामांची माहिती द्या. काही सुचना असतील, तर त्या द्यावे मी नव्याने कार्यभार स्वीकारला असल्याने मी या कामांची पाहणी करण्यासाठी आलो आहे. आपल्या सूचना व अडचणी निश्‍चित सोडवू, असे आश्‍वासन दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)