विभागात आता दोन अतिरिक्त आयुक्त

पुणे – शासनाने पुणे विभागासाठी आणखी एक अतिरिक्त आयुक्तपद निर्माण केले आहे. शासनाने विभागीय अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. डी. जी. म्हैसेकर यांची नियुक्ती केली आहे. तसेच म्हैसेकर यांच्याकडे तात्पुरता विभागीय आयुक्त पदाचा पदभारही सोपविला आहे. राज्य शासनाने गुरुवारी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यानुसार पुणे विभागासाठी आणखी एक अतिरिक्त आयुक्त पद निर्माण केले आहे.

पुणे विभागात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागाचा कारभार पाहाता विभागासाठी दोन अतिरिक्त आयुक्तांची आवश्‍यकता होती. या पदनिर्मितीमुळे लोकांची कामे लवकर होण्यास मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)