विबग्योर शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पुणे – मगरपट्टा येथील विबग्योगर शाळेला वारंवार सूचना देऊनही शाळेने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण अधिनियम कायद्याचा भंग केला असल्याचे कारण देत प्रभारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शाळेचे विश्‍वस्त, मुख्याध्यापक यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पुणे महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
शाळांकडून होणाऱ्या बेकायदेशीर शुल्कवाढीविरोधात सातत्याने आंदोलने होत असतात. मगरपट्टा येथील विबग्योग शाळेबाबतही पालकांनी तक्रारी व आंदोलने केली होती. त्यानंतरच आता राजचंद्र जाधव यांनी याबाबत 28 मार्च रोजी महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्राजक्‍ता पेठकर, गुंजन मेहता व रुपाली महाजन या पालकांच्या तक्रारीवरुन शाळेच्या मुख्याध्यापक व संस्थेचे विश्‍वस्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
जाधव यांनी काढलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, याबाबत वारंवार शिक्षण विभागाकडून सूचना जाऊनही अधिकाऱ्यांनी शाळेवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण अधिनियम 2011 व 2014 च्या तरतुदींमधील कलम 16 ते 20 नुसार भंग केलेला आहे. याबाबत शाळा प्रशासनाला वारंवार लेखी सूचना देऊनही शाळेने आदेशांचा भंग केला आहे. त्यामुळेच एसएस कोड 1979 तसेच आरटीई ऍक्‍ट 2009 मधील कलम 13, 16, 17 व 32 नुसार मुलांवर होणाऱ्या भेदभाव व मानसिक छळाबाबत खातरजमा करुन, तपासणी करुन शिक्षण विभागाला अहवाल पाठवावा. तसेच उपलब्ध कागदपत्रांनुसार शाळेच्या विश्‍वस्त व मुख्याध्यापकांवर तात्त्काळ फौजदारी गुन्हा दाखल केला जावा असेही पत्रात नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)