विप्रो कंपनीने दिले 600 कर्मचाऱ्यांना नारळ

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सॉफटवेअर कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक मुल्यांकनानंतर अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
विप्रो कंपनीने तब्बल त्यांच्या 600 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तर दुसरीकडे2 हजार कर्मचाऱ्यांना काढल्याची चर्चाही रंगत आहे. डिसेंबर 2016 पर्यंत या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या 1.76 लाखहून अधिक होती. याविषयी सांगताना, ‘वर्षभर या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मुल्यांकन केले जाते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामासोबत कंपनीची धोरणे आणि ग्राहकांची मागणी या गोष्टींचाही विचार केला जातो. या मुल्यांकनानंतर काही कर्मचाऱ्यांना नोकरी सोडावी लागते. त्यांची संख्या दरवर्षी बदलत असते त्यामुळे यंदाच्या मुल्यांकनानुसार काही कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे, असे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)