विना रिप्लेक्‍टर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

नागठाणे – पुणे- बेंगळुर महामार्गावर खिंडवाडी (ता. सातारा) ते पेठ (ता. इस्लामपूर) दरम्यान धोकादायकरित्या होत असलेल्या ऊस वाहातुकीसंदर्भात वेळोवेळी संबंधित साखर कारखान्यांना सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कराड महामार्ग वहातुक पोलिसांनी विना रिफ्लेक्‍टर महामार्गावरून ऊस वहातुक करणाऱ्या चार वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या वाहनचालकांकडून सुमारे 4 हजार रुपये दंड घेण्यात आला.

महामार्ग पोलिसांच्या या कारवाईची धास्ती येथील ऊस वाहातुकदारांनी घेतली असून अन्य वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत कराड महामार्ग वहातुक केंद्राच्या सपोनि अस्मिता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या वहातुक शाखेअंतर्गत खिंडवाडी (ता. सातारा) ते पेठनाका (जि. सांगली) असा सुमारे 75 किलोमीटरचा महामार्ग येतो. या महामार्गालगत अनेक साखर कारखाने असून गाळप हंगामात सेवा रस्त्याचा वापर न करता महामार्गावरूनच ऊस वहातुक होत असते.

-Ads-

ऊस वहातुक करणाऱ्या वाहनांच्या मागे रिफ्लेक्‍टर नसणे, प्रमाणापेक्षा जास्त ऊस वहातुक करणे, महामार्गावर धोकादायकरित्या वाहन चालवणे असे प्रकार वारंवार निदर्शनास आले आहेत. तसेच यामुळे महामार्गावर अनेक भिषण अपघात होऊन अनेक वाहनचालक मृत्यूमुखीही पडले आहेत. या सर्व संदर्भाने कराड महामार्ग वहातुक शाखेकडून संबंधित साखर कारखान्यांना वेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्र बऱ्याच साखर कारखान्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या शाखेने अश्‍या ऊस वहातुकीविरोधात कारवाईचा बागडा उगारला असून चार वाहनांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून 4 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.यापुढेही अश्‍या कारवाया केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कारवाईत सपोनि अस्मिता पाटील, पोलीस उप निरीक्षक अशोक जाधव व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)