विना परवाना शुद्ध पाण्याचा धंदा

भिगवण परिसरातील स्थिती; दुष्काळीस्थितीचा फायदा घेत उत्पादन

भिगवण- इंदापूर तालुक्‍यातील दुष्काळीस्थितीचा फायदा घेत येथे नव्यानेच शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या छोट्या कंपनी वजा एजन्सी तयार झाल्या आहेत. यापैकी एकाही एजन्सीकडे शुध्दपाणी विक्रीचा परवाना नसताना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विक्री करण्याचा धंदा जोरात सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कंपन्या, एजन्सीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

इंदापूर तालुक्‍यात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच उजनी धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. उजनीचे पाणी प्रदुषित असल्याने उजनी काठावरील गावातील लोक हे पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. त्यामुळे शुद्ध पाणी विकत घेण्याशिवाय अशा लोकांपुढे पर्याय नसतो. यातूच या परिसरातील लोक आपोआपच शुध्दपाणी पुरवठा करणाऱ्या छोट्या-मोठ्या एजन्सीकडे वळत आहेत. या शुध्दपाणी करणाऱ्या एजन्सी दोन ते तीन रुपये किमंतीच्या पाणी शुध्द करण्याच्या मशिन खरेदी करतात व आपले स्वत:चे कुपनलिकेवर पाणी शुध्द करण्याचा व्यवसाय सुरू करतात.

अन्न व भेसळ प्रशासनाची परवानी नसताना सर्व नियम धाब्यावर बसवून हा धंदा खुलेआम राजरोसपणे सुरु आहे. मुळातच जार भरून देण्याकडे अशा एजन्सीचा कल अधिक असतो. प्रत्यक्षात नामवंत कंपनीची 20 लिटर पाण्याच्या बाटलीची किमंत 60 ते 80 रुपयापर्यंत मिळते. पण, येथे मात्र, 20 लिटरची पाण्याची बॉटल फक्त 15 ते 20 रुपयांत भरून दिली जाते. हा धंदाही विना परवाना सुरू आहेत, अशा एजन्सीची चौकशी आरोग्य खात्याने कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील ग्राहकांकडून होत आहे.

  • भिगवणच्या पानात क्षार अधिक….
    भिगवण परिसरात असणाऱ्या बोअरवेलचा टीडीएस(क्षार) हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. या एजन्सीही बोअरवेलच्या पाण्यावर पाणी शुध्दीकरणचे मशिन्स बसवून पुढील प्रक्रिया करतात. त्यामुळे या एजन्सीकडुन तयार होणाऱ्या (20 लिटर) बाटलीतील पाण्यात क्षाराचे प्रमाण किती असेल, याची कल्पना येते. बाटलीत जर मोठ्या प्रमाणात क्षार येत असतील तर भविष्यात असे, पाणी पिणाऱ्यांना किडनी स्टोन सारख्या आजारांना सामोरे जावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)