विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या 80 जणांवर खटले

आरटीओत दोन तास समुपदेशन

पुणे – विनाहेल्मेट वाहन चालवणे धोकादायक असल्याचे सांगत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) कारवाईस सुरवात केली आहे. आरटीओच्या वायुवेग पथकांमार्फत गेल्या तीन दिवसांत 80 विनाहेल्मेट आणि 22 सिटबेल्ट परिधान न करणाऱ्यांवर खटले दाखल केले. तसेच, परिस्थितीत सुधारासाठी त्यांचे दोन तास समुपदेशन करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.

अपघातांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने नाराजी व्यक्त केली होती. तसेच, यापुढील काळांत अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार राज्य शासनाकडून राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना सूचना करून विनाहेल्मेट, विना सिटबेल्ट, मोबाईलवर बोलत तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्याचे सांगण्यात आले होते. यानुसार आरटीओने सोमवारपासून शहरात कारवाईस सुरवात केली. तीन दिवसांत खटले दाखल करून त्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. गुरुवारी या सर्वांचे आरटीओ कार्यालयात समुपदेशन करण्यात आले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे, चंद्रशेखर चव्हाण, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, जहांगिर हॉस्पिटलचे डॉ. संदीप बोरसे, औंध हॉस्पिटलच्या डॉ. सुहासिनी घाणेकर, स्मिता आगवणे आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

विनाहेल्मेट, सिटबेल्ट न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून खटले दाखल करण्यात येत आहेत. तसेच, त्यांच्यासाठी दर गुरुवारी आरटीओ कार्यालायात समुपदेशनाचा कार्यक्रम घेण्यात येईल. समुपदेशनास उपस्थित राहील्यानंतरच संबंधीत वाहनचालकांविरुद्धचा खटला निकाली काढण्यात येणार आहे.
– बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)