विनायक पावसकर यांचे आरोप बिनबुडाचे

कराड – ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात केलेले आरोप हे बिनबुडाचे असून या आरोपात कोणतेही तथ्य नाही. नगराध्यक्षांची भुमिका ही विकासाच्या बाजूने आहे, असे मत सत्ताधारी गटाचे गटनेते जयवंत पाटील व राजेंद्र यादव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केले.

कराड पालिकेच्या सोमवारी झालेल्या विशेष सभेस भाजपा गटाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. त्याबाबत पालिकेतील भ्रष्टाचाराचे कारण त्यांनी पुढे केले आहे. मात्र यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. उलट नगराध्यक्षा या विकासाच्या बाजूने असल्यानेच त्यांनी बहिष्कारास पाठिंबा दिलेला नसल्याचे मत जनशक्‍तीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्‍त केले. ते म्हणाले, टेंडरबाबतचे सर्व अधिकार स्थायी समितीला आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी झालेली सर्व कामे चुकीच्या पद्धतीने झालेली आहेत. ही कामे नगरपालिकेला न देता ती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली गेली होती. चांगल्या दर्जाची कामे व्हावीत, यासाठी 9.9 पेक्षा जादाची टेंडर मंजूर केली आहेत. आमचा विकास कामाला पाठींबा आहे.पावसकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत. जर विषय समिती निवडीवर बहिष्कार टाकायचा होता तर त्यांनी आपले स्वतःचे नाव स्थायी समितीवर का घेतले? भाजपा गटाचे इतर नावे का दिली नाहीत. असा आरोप करुन सत्ताधाऱ्यांनी पावसकर यांच्या भुमिकेवर टिका केली. नगराध्यक्षांची भुमिका ही विकासाच्या बाजूने आहे. त्यांना शंभर टक्‍के पाठींबा राहिल असा विश्‍वासही व्यक्‍त केला.

ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी कोणती भुमिका मांडली हे मला माहित नाही. परंतु चर्चेतून हा विषय सोडवला जाईल. आपण भाजपाबरोबर आहे. पक्ष सोडून आपली कोणतीही वेगळी भुमिका नाही.
– रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)