विनापरवाना वृक्षतोडीवर वनविभागाची कारवाई

लाकुडमालासह वाहनेही जप्त

सातारा –विनापरवाना सावर प्रजातीची वृक्षतोड व वाहतूक केल्याप्रकरणी वनविभागाने कारवाई केली असून लाकूड जप्त केले आहे. वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार मौजे मांडवे येथे ही कारवाई करणनयात आली.मांडवे येथील संपत माने यांचे मालकीच्या सावर प्रजातीच्या 3 झाडांची विनापरवाना तोड करून तयार केलेला जळाऊ लाकुडमाल ट्रॅक्‍टर क्र.एमएच 11 यु 5914 व विना नंबरची ट्रॉलीमधून विनापरवाना वाहतूक करीत असताना वनक्षेत्रपाल (प्रा.)सौ. शीतल राठोड यांनी समक्ष जागेवर पकडले. ट्रॅक्‍टर व ट्रॉली वसंत साळुंखे यांच्या मालकीची आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ट्रॅक्‍टर ट्रॉली लाकुडमालासह जप्त करून पुढील चौकशीसाठी गोडोली रोपवाटिका सातारा येथे आणून ठेवली आहे. विनापरवाना वृक्षतोड केल्याने महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम1964 सुधारणा 1989 अन्वये,तसेच विनापरवाना लाकुडमाल वाहतूक केल्याने भारतीय वन अधिनियम 1927चे कलम 41 (2) ब नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे शीतल राठोड यांनी सांगितले.या कारवाईत वनपाल परळी डी. एम. गीते , वनरक्षक कुसवडे महेश सोनावले, वनरक्षक कण्हेर संजय धोंडवड व वाहनचालक धनंजय लादे यांनी सहभाग घेतला. दरम्यान, कालच खोडशी गावच्या हद्दीत आंब्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)