विनाकारण वादात उडी घेणे पूजाला पडले महागात

प्रियांका चोप्राच्या “क्‍वांटिगो’मध्ये एका भारतीय व्यक्‍तीला दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचे दाखवले गेले आणि त्या वादामुळे प्रियांका चोप्रावर सोशल मिडीयामधून खूप टीका झाली. परिणामी प्रियांकाला माफीही मागावी लागली होती. प्रियांकानेही जास्ती स्पष्टिकरण देण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे हा विषय खरे तर तिथेच थांबला असता. मात्र पूजा भटने या प्रकरणात आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न तिच्या चांगलाच अंगलट आला.

पूजाने प्रियांकाला पाठिंबा देण्यासाठी तिला ट्रोल करणाऱ्यांची शाळा घ्यायला सुरुवात केली.
“प्रियांकाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश हे आपल्या सर्वांचे आहे. तिच्या सिनेमावर बंदीची धमकी देणे किंवा तिने न केलेल्या चूकीबद्दल तिला माफी मागायला लावणे, चुकीचे आहे. आपण या सर्वापेक्षा अधिक व्यापक विचार करायला हवा.’ असे पूजा म्हणाली होती.

“क्‍वांटिगो’मुळे आगोदरच खवळलेल्या नेटिझन्सनी पूजाला चांगलेच सुनावले. मात्र झाले उलटेच प्रियांकाच्या बरोबरीने नेटिझन्सनी तिच्यावरच रेशन घ्यायला सुरुवात केली. एका नेटिझनने तर तिला “तू पुन्हा ड्रग्ज घ्यायला लागलीस का ?’ असा थेट प्रश्‍न विचारला. यामुळे तिचा स्वतःवरचा ताबाच सुटला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“हो, मला सत्याची नशा चढली आहे. सहिष्णूतेनेच मला बरे वाटू शकेल. एखाद्याच्या आयुष्यभराच्या कमावलेल्या कामावर ट्रकभर मीठ ओतून काहीही साध्य होणार नाही.’ असे तिने फणकाऱ्याने म्हटले. तिच्याकडून आणखीन शेरेबाजी झाली, तर या वादात फुकटच्याफाकट तिला ट्रोल व्हायला लागेल, या भीतीपोटी पप्पा महेश भट यांनी मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. अतिश्रद्धांमुळे आंधळे झालेल्या व्यक्‍तीला नीट बघायला लावण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एखाद्या मनोरुग्णाकडून त्याच्या आजारावर उपचार करण्यासारखे आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली आणि हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. पप्पा महेश भट यांनी कितीही सावरासावर करण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा एकदा पूजा भटच्या व्यसनाधिनतेचा मुद्दा उफाळून आला आणि त्याचाच राग पूजा आणि महेश भट यांना आला हे लक्षात घेतले पाहिजे. पूजाला विनाकारण वादात पडणे महागातच पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)