विनाअनुदानीत प्राध्यापकांना नियमित करा

वाघोली- शिक्षक भरतीवरील बंदी उठवून रिक्त जागा भराव्यात. विनाअनुदानीत प्राध्यापकांना नियमित करावे, थकीत वेतन मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी वाघोली येथील भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी मागील पाच दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. इतर विनाअनुदानीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा बंदला पाठींबा वाढत आहे, असे पुणे जिल्हा प्राध्यापक संघाचे सचिव आर. ए. गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन या संघटनेने 25 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. याच संघटनेच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयीन अध्यापन संघटनेच्या बीजेएस शाखेच्या प्राध्यापकांनी राज्य शासनाच्या विरोधात 25 सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे.

  • ह्या आहेत मागण्या
    महाविद्यालीन शिक्षक भरतीवरील बंदी उठवून रिक्त जागा त्वरीत भराव्यात. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना नियमित आणि पूर्ण वेतन मिळावे. समान काम समान वेतनची अंमलबजावणी करणे. सातवा वेतन आयोग लागू करावा. थकीत वेतन त्वरित मिळावे. प्राध्यापकांसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करावी, अशा मागण्या। यावेळी करण्यात येत आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)