विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे आंदोलन

पुणे – कायम शद्ब वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना 100 टक्‍के अनुदान द्यावे आणि त्यासाठी आर्थिक तरतूद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीतर्फे शिक्षण आयुक्‍त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
कायम विनाअनुदानित तत्वावरील कनिष्ठ महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान द्यावे, या शाळांतील सर्व शिक्षकांचे नेमणुकीपासून समायोजन करावे, पुर्वीच्या संचमान्यतेनुसार वैयक्‍तिक मान्यतेसाठी रोष्टरची अट शिथील करावी, राज्यातील सर्व शिक्षकांना जुन्या पेन्शनची तरतूद करावी, या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.
या मागण्यांसाठी मुंबईत वारंवार आंदोलन करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व मागण्या मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतरही अद्याप काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अनुदान पात्र यादी व तरतूद करण्यासाठी सर्व प्रस्तावासाठी पुरवणी बजेटमध्ये 100 टक्‍के आर्थिक तरतूद करण्यात यावी. यानंतर निर्णय न घेतल्यास दि.2 जून रोजीपासून शिक्षण आयुक्‍त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रा. तानाजी नाईक यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)